आफ्रिका खंडातील माली या छोट्याश्या देशातील एका महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिल्याची माहिती एएफपीने या वृत्त संस्थेने दिली आहे. मोरक्को येथील रुग्णालयामध्ये या महिलेने एकाच वेळी नऊ बाळांना जन्म दिला असून सर्व बाळांची प्रकृती ठणठणीत असल्याचं माली सरकारने सांगितलं आहे. या महिलेने पाच मुली आणि चार मुलांना जन्म दिला असून सिझेरियन पद्धतीने या महिलेची प्रसुती करण्यात आली आहे. ही महिला आणि बाळांची प्रकृती ठणठणीत आहे असे हि सांगण्यात आले आहे. ही महिला सात बाळांना जन्म देईल अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. एकाच वेळी सात बाळांना जन्म देणं ही खूपच दुर्मिळ घटना आहे. मात्र नऊ बाळांना एकाच वेळी जन्म देणं दुर्मिळात दुर्मिळ घटना आहे.