…अबब ६०० ग्रॅमचे एक सिताफळ!

0

पुणे । लहरी हवामान आणि अनिश्‍चित पाऊस यापुढे हार न मानता जिल्ह्यातील दादा शेंगडे या शेतकर्‍याने सिताफळाचे चांगले उत्पादन घेतले आहे. त्यांनी रविवारी गुलटेकडी मार्केटयार्डात आणलेल्या सिताफळाला प्रति किलोस १५१ रुपयांचा भाव मिळाला. प्रत्येक सिताफळ हे तब्बल ६०० ग्रॅम इतक्या वजनाचे भरले आहे. त्यांनी ७६ किलो सिताफळ मार्केटमध्ये आणले होते.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील कुसुर्डी गावच्या दादा शेंगडे यांच्या शेतातील मार्केटयार्डात विक्रीस आलेले हे सिताफळ खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी गर्दी केली होती़ शेंडगे यांनी विक्रीस आणलेले सिताफळ आकाराने मोठे होते तसेच त्यामध्ये गरही मोठ्या प्रमाणात होता़ चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाचे असल्याने त्याची विक्रीही तात्काळ झाली, असे व्यापारी संतोष ओसवाल यांनी सांगितले. सद्यस्थितीत सिताफळाचा हंगाम ऐन बहरात आल असून मार्केटयार्डात आवक वाढू लागली आहे. रविवारी तब्बल ७ ते ८ टन इतकी आवक झाली असून मागणी वाढल्याने दरातही १० टक्क्यांनी वाढ झाल्याचे संतोष ओसवाल यांनी सांगीतले. बाजारात सध्या चांगल्या प्रतिच्या सिताफळांना मागणी आहे. तसेच दरही चांगले मिळत आहे.