पुणे । सेंद्रीय भाजीपाल्याचा दैनंदिन आहारात वापर वाढावा याकरिता सुप्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमात त्यांनी 300 किलो सेंद्रिय भाजीपाल्याची भाजी केली, अगदी घरगुती मसाला वापरून या भाज्या उत्तम होतात याचे प्रात्यक्षिक घडविले. ‘विष्णुजी कि रसोई’ येथे केलेल्या या उपक्रमात 600 पुणेकर सहभागी झाले होते. यानिमित्ताने कार्यशाळाही घेण्यात आली. सहभागी लोकांना भाजीचे वाटप करण्यात आले. या उपक्रमात खाऊची बाराखडी, ऑस्टीन 40 कैफे हाऊस, मैत्री परिवार, पूना गेस्ट हाउस, स्वाभिमान सेंटर, प्रिझम फाउडेंशन, फूड दोस्ती, लिव्हिंग फ्री पुणे, मेरा फार्मर आदी संस्था सहभागी झाल्या होत्या. आगामी काळात सेंद्रिय भाजीपाला प्रसारासाठी कार्यक्रम राबविण्याचे मनोहर यांनी जाहीर केले. सेंद्रिय वर्ष पाळले जावे असा त्यांचा प्रयत्न आहे.