जळगाव । ग्रंथ हेच गुरु असे म्हटले जाते. ग्रंथ हा मानवाला माणूसकी शिकवतो. ग्रंथाच्या सहवासामुळे अनेकांना ओळख मिळाली आहे. अबालवृध्दांसाठी ग्रंथ ज्ञानाचे भांडार असल्याचे प्रतिपादन प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी केले. महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संचालनालय व जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या संयुक्त विद्ममाने 17 व 18 रोजी सरस्वती हॉल लेवा बोर्डींग येथे ग्रंथोत्सव-2017 चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी ते होते. यावेळी ग्रंथ दिंडीचे पूजन आमदार सुरेश भोळे, महापौर ललित कोल्हे, जिल्हाधिकारी निंबाळकर, सहाय्यक ग्रंथालय संचालक आशिष ढोक, जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, उपशिक्षणाधिकारी सिध्दार्थ नेतकर आदींच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी यावेळी ग्रंथ प्रदर्शनाची पाहणी केली.