श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुट्टी देण्याची मागणी
नागपूर-सोमवारी विधानसभेत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी यांनी केलेल्या एका मागनीनंतर सर्व सदस्य चकित झाले आणि आझमी यांच्या या मागणीचे बाक वाजवून स्वागत देखील केले. आमदार आझमी यांनी श्रीकृष्ण जन्माष्टमीला सार्वजनिक सुट्टी घोषित करण्याची मागणी केली.
हे देखील वाचा
आमदार आझमी म्हणाले की, आपल्या राज्यात गणेश चतुर्थी, ईद यासंह विविध सण उत्सवाला सुट्टी दिली जाते. मात्र श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुट्टी दिली जात नाही. त्यामुळे श्रीकृष्ण जन्माष्टमीला सुट्टी देण्याची मागणी त्यांनी केली. यावेळी विरोधी पक्षांसह सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेच्या सदस्यांनीही बाक वाजवून आझमी यांच्या या मागणीचे स्वागत केले