अबू सालेमच्या शिक्षेवर आज सुनावणी

0

नवी दिल्ली – खंडणी प्रकरणी गँगस्टर अबू सालेमच्या शिक्षेवर पटियाला हाऊस न्यायालयात शनिवारी सुनावणी होणार आहे. ३० मे रोजी दिल्ली न्यायालयाने अबू सालेम खंडणी प्रकरण २ जूनपर्यंत स्थगित केले होते. २००२ मध्ये दिल्लीतील उद्योगपती अशोक गुप्ताकडून ५ कोटींची खंडणी मागितल्याप्रकरणी सालेमला दोषी ठरवण्यात आले होते. भारतीय दंड संहितेच्या कलम ३८७, ५०६/५०७ नुसार सालेमवर आरोप लावण्यात आले होते. चंचल मेहता, माजिद खान, पवन कुमार मित्तल आणि महंमद अशरफ यांना या प्रकरणातून निर्दोष मुक्त करण्यात आले तर दुसरा आरोपी सज्जन कुमार सोनीचा मृत्यू झाला आहे.