अबॅकस परिक्षेत अनुष्का कोतकर अव्वल

0

तिसरीच्या वयोगटातील स्पर्धेत मिळविले १०० पैकी १०० गुण

चाळीसगाव – नाशिक शहरातील प्रसाद मंगल कार्यालयात राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.यात इयत्ता ३ री या वयोगटातील स्पर्धत चाळीसगाव येथील संपदा अकादमीची विद्यार्थीनी अनुष्का राकेश कोतकर हीने १०० पैकी १०० गुणांकन मिळवून अव्वल क्रमांक पटकावला. अनुष्का ही चैतन्य इलेक्ट्रिकसचे संचालक राकेश कोतकर यांची कन्या असून तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. चाळीसगाव एज्युकेशन संस्थेचे सचिव डॉ.विनोद कोतकर व सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील कोतकर यांची पुतणी आहे.तिच्या यशाबद्दल आमदार उन्मेश पाटील,माजी आमदार राजीव देशमुख,अस्थिरोग तज्ञ डॉ.सुनिल राजपूत,ग्रामसेवक संघटनेचे राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम,के.डी.पाटील व चाळीसगाव तालुका ग्रामसेवक संघटनेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. आजच्या घाईच्या आणि व्यस्त जीवनमान असलेल्या जीवनशैलीत शैक्षणिक प्रगती आणि भविष्यात फायदेशीर ठरणारे निर्णय पालक जाणून असतात. चांगले शिक्षण म्हणजे फक्त परिक्षा पास होणे वा चांगले गुण मिळविणे इतका नसून अबॅकस सारख्या शैक्षणिक प्रगतीतून सर्वगुणसंपन्न करुन आधूनिक तंत्रज्ञानाच्या युगात कोतकर कुटुंबियांनी कु.अनुष्काची साधलेली प्रगती कौतूकास्पद राहिलेली आहे. सर्वसाधारणपणे जे गणित करायला मुलांना काही मिनिट लागतात ते गणित अबॅकसच्या सहाय्याने अनुष्का काही सेकंदातच सोडवू लागली आहे यातून अनुष्काची स्मरणशक्ती वाढीस लागल्याचे दिसून येते असे तिच्या पालकांनी प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.