अब शायरी मैं ‘राहत’ नही रही

0

चिन्मय जगताप :

राहत इंदौरी यांचे निधन झाले ही वार्ता कानावर आली आणि अख्खे जग एका क्षणासाठी थांबले. जणू घरातलेच कोणी गेला की, काय असा प्रश्न पडला, अचानक डोळ्यातून पाणी यायला लागले आणि घेतला पेन त्या कलंदरबद्दल लिहिण्यासाठी पण पेनही चालत नव्हता. कारण. त्या लेखणीचा खरा मालक जग सोडून चालला होता. राहत इंदोरी यांनी या देशाला काय दिले असा प्रश्न जर कोणाला पडला तर त्यांना सांगू इच्छितो इंदोरी यांनी या देशाला राष्ट्रभक्ती दिली, या देशाला प्रेम दिले. देशातले सर्व नागरिक सारखे आहेत, सर्व नागरिकांनी आपल्या धर्माची आपापल्या जातीचे अभिमान बाळगावा पण दुसर्‍यांच्या धर्माचा अपमान करू नये यामुळे देश कधीच पुढे जाणार नाही असे ते नेहमी म्हणत राहिले.

किसी के बाप का हिंदुस्तान थोडी हैं….
हा शेर म्हणजे राहत इंदौरी. हा शेर म्हणजे त्यांच्यात असलेली भारतीयता. म्हणजे सध्याच्या भारताचा आवाज. खरेच आजच्या काळात यांची गरज होती आणि नेमके ते सोडून गेले. कारण, ज्या काळात कट्टर धर्मांध लोक आपला धर्म म्हणजेच आपला देश आणि आपल्या धर्माला हा देश मान्य नाही, असे म्हणतात त्या सर्वांसाठी हा शेरे देश सर्वांचा आहे. या शेरसाठी त्यांना काहींनी जिहादी ठरवले आणि त्या सर्वांना व्याकुळतेने राहत यांनी या आरोपालाही त्याच ताकदीच्या शेरने उत्तर दिले. मैं मर जाऊं तो मेरी एक अलग पहचान लिख देना, लहू से मेरी पेशानी पे हिन्दुस्तान लिख देना !.

मुशायारांचा बादशहा !
सूत्रसंचालक एक नाव घेतो, राहत इंदौरी जे ऐकताच समोर बसलेली गर्दी एकदम उभी राहते. त्यांच्या बाजूला बसलेले सर्व सर्व शायर टाळ्यांचा कडकडाट करतात आणि मुजरा देतात. कारण सगळ्यांना माहित असते की, आता जो माणूस उभा राहून आत्ता शेर वाचणार आहे तो बादशहा आहे या व्यासपीठाचा आणि या व्यासपीठावर त्याने गेली पन्नास वर्षं अधिराज्य गाजवले. डॉ. राहत इंदोरी यांच्या काव्य प्रवासाला 50 वर्षे झाल्यानिमित्त नुकताच त्यांच्याच शहरात एक जंगी मुशायरा झाला. जावेद अख्तर, कुमार विश्‍वास यांच्यासारख्या दिग्गज उपस्थित होते. आपल्या जळगावचे जुबेर अली ताबीश यांनी त्या मुशायर्‍याची सुरुवात करत राहत साहेबांना वंदन केले होते. इंदौरीकरांनी या मुशायर्‍याला एखाद्या क्रिकेट सामन्यापेक्षाही जास्त गर्दी करून आपल्या लाडक्या शायरचे कौतुक केले. यात ते बोललेही होते – ही माणसं गेली 4-5 वर्ष माझ्या मागे लागली आहेत की, मी जश्न-ए-राहत हा कार्यक्रम करण्यासाठी हो म्हणावे पण मी नाहीच म्हणत होतो. पण या वर्षी मी हो म्हणालो. कारण, मला नाही माहित. पुढच्या वर्षी मी असेन वा नसेन आणि झालेही नेमक तसेच. पण हे शायर झाले केसे याची एक रंजक कहाणी आहे.

राहत साहेबांचा जन्म मध्य प्रदेशातील इंदूर येथे झाला. या शहरानेच त्यांना सर्व काही दिले. याचमुळे त्यांनी आपल्या नावासमोर मोठ्या अभिमानाने इंदौरी हे नाव वापरले. शालेय वयापासूनच चित्रकलेची आवड लागलेले राहतजी हे कधी काळी इंदूरमधील आघाडीचे साईन-बोर्ड पेंटर म्हणून ओळखले जात व पुढे या पेण्टिंगमधूनच त्याच्या शेरांमधेही रंग दिसू लागले. देवी अहिल्या विद्यापीठात उर्दूचे प्राध्यापक म्हणून ते सेवानिवृत्त झाले. तरुणपणी इंदूर शहरातील एका मुशायर्‍यात शायर जानिसार अख्तर यांची स्वाक्षरी घेण्यासाठी गेले असतांना त्यांनी आपल्याला देखील शायर बनायचे आहे यासाठी मी काय करावे असा प्रश्न विचारला होता. यावर अख्तर यांनी सागितले कि जर तुझे पाच हजार अशआर (गझल आणि शेर) तोंडपाठ असतील तर शायरी आपोआप येईल. यावर राहतजी खूश झाले. कारण त्यांना त्याहून कितीतरी शेर पाठ होते. येथूनच त्यांचा काव्यप्रवास सुरू झाला. वयाच्या अवघ्या एकोणाविसाव्या वर्षी त्यांची पहिला मुशायरा गाजवला व त्या नंतर पाच दशकांपासून आज हे मुशायरे गाझवटच आहेत. भारताच नव्हे तर जगातील अनेक देशांमधील हजारो मुशायर्‍यांना त्यांच्या काव्याने रोशन केल आहे. याचमुळे आज त्यांचे चाहते जगभरात आहेत.

मुशायरा संपवारा लोककवी
राहत इंदौरी यांना आजपर्यंत एकही पुरस्कार मिळालेला नाही. याचे मूळ कारण म्हणजे त्यांचे शेर सादर करण्याची शैली. चोर उच्चको कि करो कद्र, न जाने कोन कब कोनसी सरकार मी आजायेगा… हा शेर ऐकून कोणता पक्ष यांना जवळ घेईल हा देखील एक प्रश्नच होता. ते जे बोलतात ते लोकांच्या मनातले बोलतात, खरे बोलतात. त्यामुळे कोणत्याही राजकीय पक्षाला ते आपले मित्र वाटत नाहीत. हे सगळे असले तरी इंदौरी साहेब म्हणतात की, त्यांच्यासाठी खरा पुरस्कार हा लोकांच्या प्रमातून येतो आणि या प्रेमासाठी ते काहीही करू शकतात लहान सहान मुलांपासून ते थेट मोठमोठ्या शायरांना भावलेला हा लोककवी. राहत इंदौरी यांच्याबद्दल एक छान किस्सा आहे. एकदा ते आपल्या शायर मित्रांसोबत एका मुशायर्‍याला गेले होते. जिथे ते सुद्धा शेर वाचणार होते आणि त्यांच्या सोबत व्यासपीठावर एकूण बारा शायर होते. ठरल्यावेळी मुशायरा सुरू झाला, एकेक करून शायर आले आणि मुशायरा गाजवू लागले. पण राहत इंदौरींना खूप महत्त्वाचे काम आले आणि त्यांनी आयोजकांना विनंती केली की, मला जरा आधी शेर वाचू द्या. त्यांची विनंती स्वीकारली गेली आणि कार्यक्रमाच्या शेवटी शायरी सादर न करता त्यांनी मध्येच शायरी सादर केली. यामुळे झाले असे की, साहेबांनी शेर वाचले आणि तमाम प्रेक्षक वर्ग नंतरच्या शायरांची शायरी न ऐकता निघून गेला. तेव्हा एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली की, ज्या वेळेस राहत इंदौरी शेर सादर करतात त्याच वेळी तो मुशायरा संपलेला असतो बदलेला काळ आणि झालेेले दुखराहत साहेबांनी गेली पन्नास दशके विविध मुशायरे गाजवले. त्यांना तो काळ नेहमी आठवायचा ज्या काळात शायरांना इज्जत मिळायची, मुशायरे ऐकायला चांगले रसिक यायचे, ज्या मुशायरामध्ये उर्दूची आदब असायची त्याच मुशायरा यांची आज विक्री होत आहे याचे यांना वाईट वाटत. नुकत्याच पार पडलेल्या जशन ए रेखता या कार्यक्रमात त्यांनी एक प्रसंग सांगितलेला की, दिल्लीमध्ये एक मुशायरा सुरू होता. त्या मुशायरामध्ये समोर बसलेले तमाम प्रेक्षक चांगले सादरीकरण होत नसल्याने दाद देत नव्हते. यामुळे आयोजकांनी प्रेक्षकांना सांगितले की, वाह वाह तर कराच पण याच बरोबरच शिट्ट्या पण वाजवा. हे राहत इंदौरी यांना नापसंत होते. यासाठी ते त्या आयोजकांवर भर मैफिलीमध्ये रागावले. असे पुन्हा होणार नाही, असेही वचन घेतले पण काही दिवसांनी त्यांना समजले तसाच मुशायरा पुन्हा झाला पण या मुशायरामध्ये इंदौरी यांना आमंत्रित केले गेले नव्हते. आमंत्रण नव्हते. मुशायारांचे झालेले हे बाजारीकरण त्यांना मंजूर नव्हते. तर असा होता हा शायरीचा कलंदर राहत इंदोरी. प्रेमाचा शायर, देशाचा शायर राहत इंदौरीसाहेब तुमच्या साठी एक शेर हैं बद्किस्मत हम नही सुना हमने ‘गालिब’ को पर हैं किस्मत पे नाझ हमारे
सुना ही हमने ‘राहत’ को..

चिन्मय जगताप, जळगाव, मो. 8691869338