जळगाव- शहरातील आय.एम.आर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या छात्र नेता संमेलनात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची महानगर व महाविद्यालयीन कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. यात महानगरअध्यक्ष म्हणून प्रा.भूषण राजपुत यांची निवड करण्यात आली आहे.
ही कार्यकारिणी अभाविप महाराष्ट्र प्रदेश मंत्री अभिजित पाटील व विभाग संघटन मंत्री तथा दत्ता मस्के यांच्या उपस्थितीत झाली. महानगरमंत्री म्हणून रितेश चौधरी, सहमंत्री रिध्दी वाडीकर, कोष प्रमुख प्रतिक खडसे, कार्यलय मंत्री श्रीकांत पवार, प्रसिद्धी प्रमुख आकाश पाटील, विद्याथीर्नी प्रमुख श्रुती शर्मा, टीएसव्हीपी प्रमुख हर्षल तांबट, कलामंच प्रमुख ललित तोगे, सेवाप्रकल्प प्रमुख दीपक पाटील, सदस्य चेतन जाधव, विराज भामरे, प्रा.मनीष जोशी, प्रा.सुनिल कुलकर्णी, दत्ता मस्के, सिध्देश्वर लटपटे यांनी निवड झाली आहे.
तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर कार्यकारणीमध्ये नगर अध्यक्ष म्हणून प्रतिमा याज्ञिक, नगर मंत्री पूनम पाटील, सहमंत्री सोहम पाटील, महाविद्यालय प्रमुख यश चौधरी, कलामंच प्रमुख सागर जाधव, विकासार्थ विद्यार्थी प्रमुक अशोक गायकवाड, सदस्य मानस शर्मा तसेच छत्रपती शिवाजी महाराज नगर कार्यकारणीत नगर अध्यक्ष म्हणून प्रा.गौरव खोडपे, नगर मंत्री पवन भोई, सहमंत्री कुणाल पाटील, विद्याथीर्नी प्रमुख पूर्वा वैष्णव, सदस्य अंजली लोथे, किर्ती गोयर, शुभम क्षत्रीय, पायल चिमणकर, प्रा.केतन नारखेडे व जळगाव महानगरातील विविध महाविद्यालय कार्यकारणी नूतन मराठा महाविद्यालय अध्यक्ष शिवम पाटील, शासकीय तंत्रनिकेतन अध्यक्ष चिन्मय अमळकर, मु.जे.महाविद्यालय अध्यक्ष अश्विन सुरवाडे, धनाजी नाना महाविद्यालय अध्यक्ष येगेश वाडेकर, आय.एम.आर महाविद्यालय अध्यक्ष सौरभ काबरा, महिला शासकीय अध्यक्ष पूनम तायडे, रायसोनी महाविद्यालय अध्यक्ष पवन भोळे म्हणून निवड करण्यात आली आहे.