अमळनेर – सध्या देशभरात राबविण्यात येत असलेल्या “स्वच्छता मे सेवा” या उपक्रमांतर्गत आज सकाळी अभाविप शाखा अमळनेरच्या वतीने ग्रामीण रुग्णालयात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दि.२५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर ( पं दीनदयाळ उपाध्याय जयंती ते महात्मा गांधी जयंती) या दरम्यान स्वच्छता अभियान राबविण्याचे आवाहन देशवासियांना केले होते. अभाविप शाखा अमळनेरच्या कार्यकत्यानी १ ऑक्टोबर सकाळी ग्रामीण रुग्णालयात आंतररुग्ण विभाग, बाह्य रुग्ण विभाग, बाहेरील परिसराची साफसफाई केली. महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी स्वयंस्फूर्तीने परिसर स्वच्छतेचा उपक्रम राबवित असल्याचे पाहून उपस्थित नागरिक व रुग्णालयीन कर्मचाऱ्यांमध्ये कौतुकमिश्रीत भावना होत्या.
यांची होती उपस्थिती
यावेळी विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिनेश नाईक, कार्यक्रम प्रमुख हर्षदा पाटील, सहप्रमुख रोहित पवार, नेहा मोरे, क्रांती ठाकरे, कावेरी पाटील, ऋतुजा पाटील, माधुरी ठाकरे, शशिकांत पाटील, प्रतिक्षा पाटील, पल्लवी पाटील, धनश्री ठाकरे, दिपाली पाटील, रुक्सार पिंजारी, उत्कर्षा जैन,अभिषेक पाटील, विकी जाधव, आरती पाटील, अमर मिटकरी, ममता पाटील, वैष्णवी ठाकरे, कामिनी चौधरी, प्रियंका पाटील, ऋतुजा पवार आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
यांनी केले सहकार्य
या स्वच्छता अभियानास ग्रामीण रुग्णालयाचे अधिकारी, कर्मचारी, न.पा.चे प्र.आरोग्य अधिकारी अरविंद कदम, अनिल बाविस्कर, मुकादम राधेश्याम अग्रवाल, कर्मचारी अमोल बिरहाडे, गोपाल बिऱ्हाडे, आनंद बिऱ्हाडे, सिध्दार्थ मोरे, न.पा.चे शहर सफाई कामाचे ठेकेदार मँक्रो कं.यांचे सहकार्य लाभले. अभाविपने राबविलेल्या सफाई अभियानाबाबत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ जी.एम.पाटील यांनी समाधान व्यक्त केले व अभाविपचे आभार मानले आहेत.