‘अभिजात’ मराठीचा ठराव मांडणार

0

मुंबई: मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्यासाठी गेल्या काही दिवसांत संसदेत हालचालींना वेग आला. या पार्श्वभूमीवर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात अभिजात मराठीचा ठराव मांडायला हरकत नाही, असे मत विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी व्यक्त केले.

अभिजात मराठीचा औचित्याचा मुद्दा आमदार हेमंत टकले यांनी विधानपरिषदेत उपस्थित केला. आतापर्यंत किती वेळा मराठीच्या अभिजाततेचा मुहूर्त टळला, याचे अनेकदा विवेचन झाले. त्यामुळे आता मराठीच्या फायलीवर धुळीचे आणखी थर साचण्याआधी आपल्या दोन्ही सदनाने ठराव करून लोकसभेत पाठवावा, म्हणजे येत्या महाराष्ट्र दिनापर्यंत तरी निर्णय होईल, असे टकले यांनी सुचवले. त्याला सभापतींनी सहमती दर्शवली. टकले यांच्या सूचनेप्रमाणे ठराव आणायला हरकत नाही. विधानपरिषदेत आपण ठराव मांडूच, असे सभापती असे स्पष्ट केले .

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी यासाठी मराठीला अभिजात दर्जा देण्यासंदर्भातले सर्व पुरावे राज्याने केंद्राकडे सादर केलेले आहेत. त्यामुळे त्याचा विचार करुन तातडीने ही मागणी पूर्ण करावी अशी मागणी शिवसेनेचे खासदार श्रिरंग बारणेंनी लोकसभेत केली होती. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मराठी भाषेत ५२ बोली भाषांचा समावेश आहे. आतापर्यंत केंद्राने तामिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम या दाक्षिणात्य भाषांसह संस्कृत भाषेला अभिजात दर्जा दिला आहे.