अभिनयाच्या जोरावर स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी कोंकणा सेन झाली ३९ वर्षांची

0

मुंबई : सौंदर्याने नाही तर आपल्या अभिनयाने स्वतःची जागा बनवणारी अभिनेत्री कोंकणा सेनने बॉलीवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज तीचा ३९ वा वाढदिवस आहे. तिचे लग्न अभिनेता रणवीर शोरेसोबत झाले आहे. मात्र, काही काळानंतर रणवीर आणि कोंकणा लग्नाच्या ५ वर्षानंतर २०१५ मध्ये विभक्त झाले. कोंकणा बद्दलची एक गोष्ट कदाचित खूप कमी जणांना माहिती असेल, की ती लग्नाआधीच गरोदर झाली होती.

कोंकणा ही पत्रकार आणि सायन्स रायटर मुकुल शर्मा यांची मुलगी आहे. तिने १९८३ मध्ये बंगाली चित्रपट ‘इंदिरा’मध्ये चाईल्ड आर्टिस्टच्या रुपात काम सुरू केले होते. कोंकणाने आपली आई अपर्णा यांच्या डायरेक्शनमध्ये इंग्रजी भाषेचा ‘Mr. and Mrs. Iyer’ या चित्रपटात काम केले आणि तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा पुरस्कार प्राप्त झाला.

लग्नानंतर १५ मार्च, २०११ मध्ये कोंकणाने मुलाला जन्म दिला होता. लग्नाच्या ७ महिन्यानंतरच बाळाचा जन्म झाल्यामुळे तिच्याविषयी बरीच चर्चा करण्यात आली.