अभिनय बेर्डेने शेअर केली एक खास पोस्ट!

0

मुंबई: विनोदी भूमिकांनी नेहमीच प्रेक्षकांची मने जिंकणारा लक्ष्मीकांत बेर्डे ,म्हणजेच आपला ‘लक्ष्या’ आजही स्मरणात आहे. मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. आता वडिलांच्या म्हणजेच लक्ष्याच्या पावलावर पाऊल ठेवत लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डे यानेही चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे. अलिकडेच झालेल्या मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात अभिनयने फिल्मफेअर पुरस्कारावर त्याचे नाव कोरले आहे.

फिल्मफेअर पुरस्कार कलाकारांसाठी अत्यंत महत्वाचा मानला जातो. मराठी फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्याचा चौथे वर्ष होते. ‘ती सध्या काय करते’ या चित्रपटातून अभिनयने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले होते. त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला आहे.

विनोदाचा बादशाह लक्ष्मीकांत बेर्डेलाही १९८५ साली सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. अभिनयने लक्ष्मीकांत बेर्डेंना मिळालेली फिल्मफेअर ट्रॉफी आणि त्याला मिळालेल्या ट्रॉफीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ‘लाईक अ फादर लाईक अ सन’ असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.