जळगाव । प्रतिनिधी । सिने अभिनेता आदित्य पांचोली हे जळगावात एका खाजगी कार्यक्रमानिमित्त आल्यानंतर जळगावकरांनी त्यांना पाहण्यासाठी गर्दी केल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच तारांबळ उडाली.
लग्न समारंभास उपस्थिती
प्लॉट खरेदी विक्रीचा करणारे व्यावसायीक किरण सैंदाणे यांच्या लग्नानिमित्त बुधवारी आदित्य पांचोली हे जळगावात आले होते. आदित्य पांचोली हे जळगावात आल्याची वार्ता जळगावात पसरल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना त्यांना पाहण्यासाठी उत्स्फूर्त गर्दी केली होती. त्यांच्या सुरक्षेसाठी अर्जुन मल्टीसर्व्हिसेसचे खास आठ बाऊन्सर तैनात करण्यात आले होते मात्र चाहत्यांनी प्रचंड गर्दी केल्याने सुरक्षा यंत्रणांची चांगलीच धावपळ उडाली. बुधवारी सायंकाळी कामायनी एक्स्प्रेसने पांचोली जळगावात दाखल झाले तर रात्री उशीरा ते मुंबईकडे रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
१९८६ साली ङ्गसस्ती दुल्हन और महंगा दुल्हाफ या चित्रपटातील प्रवेशानंतर व दिग्दर्शक महेश भट्ट यांच्या ङ्गजख्मी जमीनफ या चित्रपटातील भूमिकेनंतर प्रकाशझोतात आलेल्या आदित्य उर्फ निर्मल राजन पांचोली यांनी बॉलीवूडमध्ये जम बसवल्याने ते चाहत्यांच्या गळ्यातील ताईत झाले होते.