अभिनेता आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण

0

पुणे : अभिनेता आमिर खानला स्वाईन फ्लूची लागण झाली आहे. खुद्द आमिर खाननेच ही माहिती पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कप सोहळ्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिली. पाणी फाऊंडेशनच्या वॉटर कपचा सोहळा पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रंगला होता. या कार्यक्रमात आमिर खान आणि किरण राव यांची अनुपस्थिती होती. त्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आमिर खानने ही माहिती दिली. तसेच त्याने विजेत्यांना शुभेच्छा दिल्या.

त्याने त्याची पत्नी किरण रावलाही स्वाईन फ्लूची लागण झाल्याचेही सांगितले. स्वाईन फ्लू झालेल्या रूग्णाला आराम करण्याची आणि औषधे घेण्याची आवश्यकता असते. त्याचमुळे आपण पाणी फाऊंडेशच्या कार्यक्रमात हजर राहू शकलो नाही, असे आमिर खानने म्हटले. सगळ्या विजेत्यांचे त्याने आभारही मानले. कार्यक्रमाला शाहरूख खान उपस्थित होता.