अभिनेता दलीप ताहिलने दारुच्या नशेत रिक्षाला दिली धडक

0

मुंबई: अनेक चित्रपटात व्हिलनचे भूमिका निभावल्यानंतर प्रसिद्धीस आलेले अभिनेता दलीप ताहिल यांना पोलिसांनी अटक केली आहे. दलीप ताहिल दारु पिऊन गाडी चालवत होते. दारुच्या नशेत त्यांनी एक रिक्षाला धडक दिली.

खारमध्ये राहणारे जेनिता गांधी (२१) आणि गौरव चुघ (२२) रिक्षातून जात असताना दलीपच्या कारने त्यांना धडक दिली. दलीप ताहिल यांनी घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. पण रस्त्यावर गर्दी असल्याने ते जास्त दूर जाऊ शकले नाही. जेनिताने प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली की, ‘आम्ही कारचा नंबर नोंद केला होता. दलीप आमच्याशी वाद घालू लागल्यानंतर आम्ही पोलिसांना बोलावलं. खार पोलीस घटनास्थळी आले आणि आम्हा सर्वांना पोलीस ठाण्यात घेऊन गेले’.

खार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय यांनी सांगितलं आहे की, ‘दलीप यांना अटक करण्यात आली होती, नंतर त्यांना जामीनावर सोडण्यात आलं.