बंगळूर-दाक्षिणात्य अभिनेता प्रकाश राज हे गेल्या काही दिवसांपासून राजकारणात सक्रीय आहेत. ते सातत्याने मोदी सरकारवर टीका करीत असते. दरम्यान आज पत्रकार परिषद घेत अभिनेता प्रकाश राज यांनी आगामी लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे.
बंगळूर सेन्ट्रलमधून ते अपक्ष लोकसभा लढविणार आहे. दरम्यान पत्रकार परिषदेत त्यांनी कॉंग्रेस मला पाठींबा देऊ शकते असेही त्यांनी सांगितले.