अभिनेता प्रकाश राज लढवणार लोकसभा निवडणूक

0

मुंबई : बेधडकपणे आपलं मत मांडणारे अभिनेते प्रकाश राज आता राजकारणाच्या आखाड्यात उतरणार आहेत. नववर्षाच्या सुरूवातीला आपण २०१९ ची निवडणुक लढवणार असल्याचं प्रकाश राज यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून जाहीर केलं आहे.

गेल्या वर्षभरात मोदी आणि भाजप सरकावर त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून टीका केली. इतकंच नाही तर मी भाजपवर टीका करतो म्हणून मला कोणी काम देत नाही असंही ते म्हणाले होते.