अमळनेर । येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिराचे अभिनेता बाळ धुरी यांनी दर्शन घेतले. श्री.धुरी यांनी अनेक चित्रपटात आणि दूरदर्शनवरील मालिकांमध्ये विविध भूमिका केल्या आहेत. दूरदर्शनवरील प्रचंड गाजलेली, रामानंद सागर दिग्दर्शित ’रामायण’ या मालिकेत त्यांनी राजा दशरथाची भूमिका केली होती. ख्यातनाम अभिनेत्री जयश्री गडकर यांचे ते पती आहेत. मंगळग्रह सेवा संस्थेतर्फे अध्यक्ष डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस.येन.पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी युनियन बँकेचे व्यवस्थापक मयूर पाटील व त्यांचे सहकारी उदय पाटील आदी उपस्थित होते.