अभिनेता राहुल दीक्षितची गळफास घेऊन आत्महत्या

0

मुंबई : टीव्हीवरील विविध मालिकांमध्ये काम करणाऱ्या राहुल दीक्षित या अभिनेत्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली असून बुधवारी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.

एका वृत्त संस्थेच्या वृत्तानुसार, राहुल दीक्षित असे आत्महत्या केलेल्या २८ वर्षीय अभिनेत्याचे नाव आहे. बुधवारी सकाळी त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले. तो टीव्हीवरील विविध मालिकांमध्ये काम करीत होता. त्याने कोणत्या कारणासाठी आत्महत्या केली हे अद्याप कळू शकलेले नाही. या घटनेचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.