अभिनेता विकी कौशलचा ‘उरी’ चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0

मुंबई : अभिनेता विकी कौशलचा ‘उरी’ चित्रपटाचा ट्रेलर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटाचा ट्रेलर 5 डिसेंबरला रिलीज होणार असून विकी कौशलने ट्विटरद्वारे याची माहिती दिली आहे. जम्मू काश्मीरच्या ‘उरी’ येथे झालेल्या भारत-पाकिस्तानच्या हल्ल्यात १९ भारतीय सैनिकांना वीरमरण आले होते. भारताने यावेळी सर्जिकल स्ट्राईक करुन पाकिस्तानला चांगला धडा शिकवला होता. याच हल्ल्यावर आधारित हा ‘उरी’ चित्रपट आहे.

चित्रपटात विकी कौशल आणि यामी गौतम यांची प्रमुखे भूमिका आहे. तर मोहित रैना, परेश रावल, किर्ती कुल्हारी, रॉनी स्क्रूवाला यांच्याही सिनेमात महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. तर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांच्या भूमिकेत परेश रावल झळकणार आहेत. या सिनेमाचे अॅक्शन सीन शूट करताना विकीला दुखापत देखील झाली होती. हा चित्रपट पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये असून हा चित्रपट ११ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विकी कौशलने ‘मसान’, ‘राझी’, ‘संजू’ आणि अलिकेडेच रिलीज झालेल्या ‘मनमर्जियां’, या चित्रपटात वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. त्याच्या दमदार अभिनयाचे सर्वांनी कौतुक केले.