अभिनेता वैभव तत्ववादी याने आपल्या आगामी चित्रपटाची केली घोषणा

0

मुंबई : मराठी चित्रपटात आपल्या अभिनय कौशल्याने रसिकांना ठसा पाडणारा अभिनेता वैभव तत्ववादी याने आपल्या आगामी सिनेमाची घोषणा सोशल मीडियावर केली आहे. यात तो एका हटके भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येईल.त्याच्या आगामी सिनेमाचे नाव ‘ग्रे’ असे आहे. या चित्रपटाचा पोस्टरही त्याने सोशल मीडिया शेअर केला आहे .

‘सुराज्य’, ‘कॉफी आणि बरंच काही’, ‘शॉर्टकट’, ‘मि. अॅण्ड मिसेस सदाचारी’ यांसारख्या मराठी सिनेमात आणि ‘हंटर’, ‘बाजीराव मस्तानी’ व ‘लिपस्टिक अंडर माय बुरखा’ या हिंदी चित्रपटात तो झळकला आहे. त्याने कमी कालावधी मध्ये मराठी सिनेसृष्टीत आपली ओळख निर्माण केली आहे. काही दिवसापूर्वीच ‘व्हॉट्सअप लग्न’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने आमच्या नव्या चित्रपटाचे पोस्टर सादर करतो. ‘ग्रे’ असे या सिनेमाचे नाव असून अभिषेक जावकरचा हा सिनेमा आहे. हा चित्रपट 2019मध्ये रिलीज होणार आहे.