भुसावळात वाल्मिकी समाज सुधार मंडळातर्फे निवेदन
भुसावळ : एका खाजगी टीव्ही चॅनलवर अभिनेता सलमान खान व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांनी वाल्मिकी मेहतर समाजाच्या भावना दुखावतील अशा पध्दतीच्या जातिवाचक शब्दांचा उल्लेख केल्याने त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वाल्मिकी समाज सुधार मंडळातर्फे प्रांताधिकारी श्रीकुमार चिंचकर यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हा चिटणीस राजू खरारे यांनीही याबाबत निवेदन दिले आहे. दरम्यान, वाल्मिकी समाज सुधार मंडळाच्या निवेदनावर राजू खरारे, मोहन घारू, रमेश घिसाला, अर्जुन ढोलपुरे, कपिल ढिंक्याव, गोरधन नथ्थू आदींच्या स्वाक्षर्या आहेत.