अभिनेता सागर देशमुखला हृदय विकाराचा झटका

0

मुंबई-मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता सागर देशमुख याला हृदय विकाराचा सौम्य झटका आला असून त्याला कांदिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ‘हंटर’ हिंदी चित्रपट, ‘वाय झेड’ मराठी चित्रपटात अभिनेता सागर देशमुखने मुख्य भूमिका साकारली असून आता ‘तो भाई व्यक्ती आणि वल्ली’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारताना दिसणार आहे. तो पु.ल. देशपांडे यांच्या भूमिका साकारणार आहे.