राहुल गांधींवर बयोपिक करणार; अभिनेता सुबोध भावेची घोषणा !

0

पुणे – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आज पुण्यात आले आहे. त्यांनी पुण्यामध्ये पाच हजार विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना मनमोकळेपणाने उत्तरे दिली. या दरम्यान मराठी अभिनेता सुबोध भावे आणि आरजे मलिष्का यांनी राहुल गांधींची मुलाखत घेतली. यावेळी अभिनेता सुबोध भावे याने राहुल गांधींवर बायोपिक करणार असल्याची घोषणा केली.

अभिनेता सुबोध भावे आणि बायोपिक हे जणू समीकरण बनले आहे. सुबोध आता कोणत्या बायोपिकमध्ये दिसणार याची उत्सुकता चाहत्यांना लागलेली असताना खुद्द त्यानेच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर बायोपिक करणार असल्याची घोषणा केली.

सुबोध भावेने ‘मी अभिनेता आहे आणि आजवर अनेक बायोपिक मी केले आहेत. मला अनेकदा लोक सांगतात की तू राहुल गांधींसारखा दिसतो. त्यामुळे माझा पुढचा बायोपिक मला राहुल गांधींवर करायचा आहे. आज राहुल गांधींसोबत चर्चा करताना मला बऱ्याच नव्या गोष्टी कळल्या. राजकारणापलीकडे जाऊन हा माणूस बरंच काही करतो. राहुल गांधी प्रोफेशनली स्कूबा डायविंग करतात, ते कराटे ब्लॅक बेल्ट आहेत, ते प्रोफेशनल पायलट आहेत. मी त्यांचा फॅन झालो आहे. ‘ असे सुबोध म्हणाला. या बायोपिकमध्ये सुबोध राहुल गांधी यांची भूमिका साकारणार असून चित्रपाटच्या दिग्दर्शनाची धुरादेखील सुबोध भावे स्वत: सांभाळणार असल्याचे त्याने सांगितले.