अभिनेते विरुध्द गुन्हा दाखल करण्याची रावेरात मागणी

0

रावेर । आक्षेपार्थ वक्तव्य करून समस्त वाल्मिकी समाजाचा अपमान केल्याप्रकरणी सलमान खान, शिल्पा शेट्टी विरुध्द अट्रासीटीप्रमाणे गुन्हा दाखल करण्याची मागणी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे. याबाबत वृत्त असे एका खाजगी कार्यक्रमात अभिनेते सलमान खान, शिल्पा शेट्टी यांनी आक्षेपार्ह शब्दाचा वापर केल्याप्रकरणी समाज बांधवांच्या भावना दुखावल्या आहेत. याबाबत तहसीलदार यांना अभिनेते यांच्यावर गुन्हा दाखल करून कायेदशीर कारवाई करावी अशी मागणी करण्यासाठी निवेदन देण्यात आले. यावेळी महेंद्र गुजराथी, सुनील हंसकर, रवी छपरीबंद, दिलीप कांबळे, निकम छपरीबंद, चंपालाल बाजरे, जीतू कंडारे, नरेंद्र जावे, नगिनदास जावे, कुणाल हंसकर, धीरज जावे आदि समाज बांधव उपस्थितीत होते.