अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या एका आजाराने ग्रस्त

0

मुंबई:अभिनेत्री अनुष्का शर्मा सध्या एका आजाराने ग्रस्त असून त्यासाठी ती ट्रिटमेंट घेत आहे. अनुष्काला बल्जिंग डिस्क नावाचा आजार झाला आहे. बल्जिंग डिस्कमुळे प्रचंड अंगदुखीचा त्रास सतावतो. बल्जिंग डिस्क या आजाराला हार्नियेटेड डिस्कही म्हटले जाते. सध्या हा आजार अनेक जणांमध्ये आढळून येतो. हा आजार पाठीच्या मणक्यापासून सुरु होतो.

त्यानंतर हळूहळू संपूर्ण शरीराच्या हाडांपर्यत पोहोचतो. त्यामुळे शरीराच्या इतर अवयवांनाही प्रचंड वेदना होतात. मीडिया रिपोर्टनुसार, बल्जिंग डिस्कमुळे वैतागलेल्या अनुष्काला डॉक्टरांनी 3 ते 4 आठवडे बेड रेस्ट घेण्याचा सल्ला दिला आहे.