नवी दिल्ली : समाजवादी पक्षाच्या माजी खासदार अभिनेत्री जयाप्रदा यांनी आज अखेर भाजपचा झेंडा हाती घेतला आहे. उत्तर प्रदेशातील रामपूर मतदारसंघातून त्या समाजवादी पक्षाचे उमेदवार आझम खान यांच्या विरोधात निवडणूक लढविणार आहे. ज्या पक्षांचे नेतृत्व देशाच्या सुरक्षेच्या मुद्द्यावर लक्ष घालते अशा पक्षात मी प्रवेश केल्याचा मला आनंद होत आहे असे जयाप्रदा यांनी सांगितले.
२०१० मध्ये त्यांना समाजवादी पार्टीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. पक्षविरोधी कारवाया केल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यांनी अमर सिंह यांच्याशी हात मिळवणी केली आणि राष्ट्रीय लोकमंच पार्टीच्या बॅनर अंतर्त 2012 मध्ये लोकसभा निवडणूक देखील लढली. पण त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही.