अभिनेत्री पायल घोषचा रिपाईत प्रवेश

0

मुंबई: दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप अभिनेत्री पायाल घोषने केले होते. त्यानंतर पायाल घोष चर्चेत आल्या आहेत. अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचे आरोप केल्यानंतर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पायल घोषची बाजू घेत राज्यपाल यांची भेट घेतली होती. दरम्यान आज अभिनेत्री पायल घोषने रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई)त प्रवेश केला आहे. मुंबईत प्रवेश झाला.

कंगना रानौत, पायल घोषच्या समर्थनार्थ रामदास आठवले आले होते. त्यासाठी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट देखील घेतली होती.