अभिनेत्री पायल रोहतगीचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य; छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट

0

मुंबई: आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमी चर्चेत राहणाऱ्या बॉलिवूडची अभिनेत्री पायल रोहतगीने पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. काही दिवसांपूर्वी पायल रोहतगीने महान समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांच्याबद्दल वादग्रस्त मत मांडत सती प्रथेचे समर्थन केले होते. आता पायलने महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त पोस्ट टाकली आहे.
तिच्या या पोस्टमुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

https://www.instagram.com/p/ByMovg7gTC7/?utm_source=ig_embed

शिवाजी महाराज हे मुळचे क्षत्रिय नसून ते शुद्र जातीत जन्माला आले होते, असे तिने या पोस्टमध्ये म्हटले आहे. शिवाय मराठा आरक्षणावरही आक्षेप घेतला आहे. महाराष्ट्रात मराठ्यांना आरक्षण का दिले? असा थेट सवालही तिने केला आहे.

स्वत:चे आणि पती संग्राम सिंगचा फाटो सोबत तिने ही पोस्ट लिहिली आहे. तूर्तास तिच्या या पोस्टवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी पायलने नथुराम गोडसेची पाठराखण करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला हो. नथुराम गोडसे हा स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी आहे, या सुपरस्टार कमल हासन यांच्या वक्तव्याचा निषेध करणारी ही पोस्ट होती.

‘कमल हासन यांना दहशतवाद आणि खून याच्यातला फरक कळत नाही. स्वतंत्र भारताचा पहिला दहशतवादी गोडसे नसून जिना होते,’असे तिने म्हटले होते. यापाठोपाठ राजा राममोहन राय हे इंग्रजांचे ‘चमचे’ असल्याचे पायलने म्हटले होते.