अभिनेत्री प्रिया बेर्डेंचा राष्ट्रवादीत प्रवेश !

0

पुणे: मराठी कलाविश्वातील दिवंगत लोकप्रिय अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या पत्नी अभिनेत्री आणि दिग्दर्शिका प्रिया बेर्डे यांनी आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चित्रपटसृष्टीमध्ये पडद्यामागे राहून काम करणाऱ्या लोकांसाठी काही तरी करता यावे, यासाठी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

प्रिया बेर्डे यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पुणे जिल्हाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली जाणार आहे. त्यांच्यासह अनेकांचा यावेळी प्रवेश झाला.