अभिनेत्री म्हणून मिळणारे ग्लॅमर क्षणिक : जमेनीस

0

शास्त्रीय नृत्याद्वारे भारतीय संस्कृतीच्या प्रसाराचे कार्य अधिक समाधानकारक

पुणे । अभिनेत्री म्हणून मिळणारे प्रसिद्धीचे वलय आणि पैसा या गोष्टी क्षणिक आहेत. मात्र देश विदेशात भारतीय संस्कृतीचे वैशिष्ट्य असलेल्या शास्त्रीय कलांचा प्रसार करण्याची मिळालेली संधी अधिक समाधानकारक असल्याचे मत विख्यात शास्त्रीय नृत्यांगना आणि अभिनेत्री शर्वरी जमेनीस यांनी व्यक्त केले.

वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी विख्यात स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. वैशाली चव्हाण यांना राजा हरिशचंद्र गोल्डन ट्रस्टच्या वतीने जमेनीस यांच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब धंदर, विख्यात संगीतकार मोहनकुमार भंडारी, प्रसिद्ध एकपात्री कलावंत मोनिका जोशी, सामाजिक कार्यकर्ते अनिल नळे आदी उपस्थित होते.

यावेळी जमेनीस यांना राष्ट्रीय प्रतिभा कलावंत पुरस्कार देण्यात आला. भंडारी यांना संगीत क्षेत्रातील कार्यासाठी; तर मोनिका जोशी यांना एकपात्री प्रयोगाद्वारे रसिकांच्या चेहर्‍यावर हास्य फुलविल्याच्या कामगिरीसाठी विशेष पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. शाल, श्रीफल, सन्मानचिन्ह, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्कारामुळे आपण केलेल्या कार्याची पावती मिळते, त्याचप्रमाणे आपापल्या क्षेत्रात अधिक समर्थपणे योगदान देण्याची जबाबदारीही जाणवते. त्यामुळे कोणताही पुरस्कार आपल्याला प्रेरणा देणारा असतो, असे जमेनीस यांनी यावेळी सांगितले.