मुंबई : मालिका आणि हिंदी चित्रपटांतील भूमिकांसाठी प्रसिद्ध असलेल्या नर्गिस राबडी यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. बॉलिवूडमध्ये त्या शम्मी आंटी नावाने परिचित होत्या. त्या 89 वर्षांच्या होत्या. सोशल मीडियावरून त्यांच्या निधनाचे वृत्त सर्वांना समजले. वयाच्या अवघ्या 18 व्या वर्षी उस्ताद पेद्रो (1949) चित्रपटातून त्यांनी पदार्पण केले होते. शम्मी यांनी 64 वर्ष चित्रपटसृष्टीत कार्यरत होत्या. शम्मी यांच्या कुली नंबर 1, खुदा गवाह, हम, अर्थ, द बर्निंग ट्रेन या चित्रपटातील भूमिका गाजल्या होत्या. त्यांनी 200 हून अधिक हिंदी चित्रपटांमध्ये काम केले होते. त्यांचा जन्म 1931 मध्ये मुंबईतील एका पारसी कुटुंबात झाला. नर्गिस राबडी हे त्यांचे मूळ नाव. त्यांची मोठी बहीण नीना (मनी) राबडी ही फॅशन डिझायनर होती. वयाच्या तिसर्याच वर्षी त्यांच्या वडिलांचा मृत्यू झाला. निर्माते-दिग्दर्शक सुलतान अहमद यांच्यासोबत सात वर्षांच्या संसारानंतर दोघांनी घटस्फोट घेतला होता.