अभिप्रायासाठी आवाहन

0

पिंपरी-चिंचवड । महापालिकेतर्फे तळवडे येथे साकारण्यात येणार्‍या प्राणीसंग्रहालयासाठी जन-सर्वेक्षण करण्यात येणार आहे. नागरिकांनी आपले अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे. महापालिकेतर्फे तळवडे येथील 58 एकर जागेत प्राणीसंग्रहालय किंवा सफारी पार्क करण्याचे नियोजन आहे.

शहरासाठी एक आकर्षक पर्यटन बनणार्‍या या पार्कमध्ये सिंगापूर येथील जगप्रसिद्ध जुरॉग बर्ड पार्कच्या धर्तीवर पक्षीउद्यान असणार आहे. नाईट सफारी पार्कच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशासारख्या उजेडात वाघ, उदमांजर, गेंडे आदी प्राण्यांना नैसर्गिक अधिवासात पाहता येणार आहे. हा प्रकल्प साकारण्यासाठी नागरिकांच्या संकल्पना, त्यांचे अभिप्राय मागविण्यात येत आहेत. नागरिकांनी महापालिकेच्या www.pcmcindia.gov.in या संकेतस्थळावर पर्यटन तळवडे प्रस्तावित प्रकल्प या लिंकवर 20 ऑक्टोंबरपर्यंत अभिप्राय नोंदवावेत, असे आवाहन महापालिकेने केले आहे.