पाचोरा – संपूर्ण पाचोरा शहरासाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शहरातील रहिवासी विशाल पाटील हे मुख्याध्याकारी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. सध्या ते सिल्लोड नगरपालिकेत पाणीपुरवठा अभियंता या पदावर कार्यरत आहेत. लवकरच प्रशिक्षण पूर्ण करून ते नगरपालिकेत मुख्याध्याकारी या पदावर रुजू होणार आहेत. विशाल पाटील हे पाचोर्यातील ओ ना वाघ पतसंस्थेचे मॅनेजर साहेबराव पाटील यांचे सुपुत्र आहेत.
परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे पाचोरा शहरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.