अभियंता निखील भावसारचे मरणोत्तर नेत्रदान

0

नेत्रदानाने दोन अंध बांधवाना मिळाली नेत्रदृष्टी

भुसावळ- शहरातील एका अभियंता युवकाचे अपघाती निधन झाले तत्पूर्वी त्याच्यावर सुरू असलेल्या 25 दिवसांच्या उपचारादरम्यान या अभियंता युवकाने मरणोत्तर नेत्रदाना केल्यामुळे दोन अंध बांधवाना नेत्रदृष्टी मिळाली. निखील भावसार या मयत अभियंत्याने समाजापुढे एक आदर्श निर्माण निर्माण केला आहे.

अथक उपचारानंतरही गाठले मृत्यूने
शहरातील प्रभात कॉलनीतील रहीवासी व महावितरण कंपनीचे खासगी अभियंता ठेकेदार निखील बन्सीलाल भावसार (वय 39) हे महिनाभरापूर्वी शहरात सुटलेल्या वादळ्याच्या तडाख्यात सापडल्याने त्यांच्या अंगावर गजानन महाराज नगर भागात झाड कोसळल्याने ते गंभीर जख्मी झाले होते. यामुळे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात महिनाभरापासून उपचार सुरू होते मात्र अथक उपचारानंतरही मृत्यूने त्यांना कवटाळले. यामुळे त्यांच्या कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला मात्र अशा परीस्थितीत कुटुंबियांनी निखील भावसार यांना मरणोत्तर केलेल्या नेत्रदानाच्या संकल्पानुसार मांगीलालजी बाफना नेत्रपेढीत निखील यांचे दोन्ही नेत्रदान करण्यात आले. दोन्ही अंध बांधवांना शस्त्रक्रियेने नेत्ररोपण केल्याने दोघांना नेत्रदृष्टी प्राप्त झाली. निखील भावसार यांनी मरणोत्तर केलेल्या नेत्रदानामुळे अनेकांसमोर एक आदर्श निर्माण झाला असून निखील यांनी केलेल्या कार्याची आठवण येताच अनेकांचे डोेळे पाणावत आहेत. निखील भावसार यांच्या पश्‍चात वडील, दोन लहान मुले व पत्नी असा परीवार आहे.

प्रमाणपत्र देवून गौरव
निखील भावसार यांनी मरणोत्तर केलेल्या नेत्रदानामूळे बाफना नेत्रपेढी जळगावतर्फे भावसार कुटुंबीयांना आभार व गौरवपत्र देवून गौरवण्यात आले. नेत्रपेढीतर्फे देण्यात आलेले आभार व गौरवपत्र नेत्रदुत सुरेंद्र चौधरी व चंद्रकांत राणे यांनी भावसार कुटुंबीयांच्या स्वाधीन केले.