अभियंता संघटनेचे सामूहिक रजा आंदोलन

0

नंदुरबार । जिल्हा परिषदेंतर्गत काम करणार्‍या शाखा व कनिष्ठ अभियंता यांच्या प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांसाठी अभियंता संघटनेच्या वतीने दिनांक 19 व 20 मार्च रोजी सामूहिक रजा आंदोलन पुकारण्यात आले असून जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात आली प्रलंबित मागण्यांसाठी शासनास वारंवार निवेदने त्याचप्रमाणे मंत्र्यांसोबत चर्चा करण्यात आली. परंतु , कुठलीही मागणी मंजूर न झाल्यामुळे जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी शासनाच्या दुर्लक्षित धोरणाचा निषेध म्हणून दिनांक 15 मार्च रोजी राज्यभरात काळ्या फिती लावून काम केले होते.

या आहेत मागण्या
वेतनातील त्रुटी दूर करणे, आश्‍वासित प्रगती योजनेचा लाभ मिळणे, प्रलंबित प्रवास भत्ता देके अदा करणे, रिक्त पडे भरण, नवीन उपविभागाची निर्मिती, उपअभियंता पदाचा कोटा पुनर्विलोकन करणे अशा मागण्या आहेत. आंदोलनाच्या दुसरा टप्पा म्हणून दि.19 व 20 मार्च रोजी सामूहिक रजा घेत आंदोलन करण्यात येत आहे. आंदोलनात जिल्हा परिषद अभियंता संघटनेची शेकडो सदस्य सहभागी झाले आहेत. शासनाने दखल न घेतल्यास तीव्र लढा उभारण्याची तयारी असल्याचे जिल्हा अध्यक्ष अभियंता यशवंत गायकवाड यांनी दिली. आंदोलनात जिल्हा सचिव अभियंता नंदू पवार, कार्याध्यक्ष अभियंता संजय हिरे, जिल्हा उपाध्यक्ष अभियंता एकनाथ भामरे, संजय पवार सागर पवार जिल्हा सहसचिव अभियंता तुकाराम गावित, तुकाराम ठाकरे, दत्तात्रय पिसे, जिल्हा कोषाध्यक्ष अभियंता ईश्‍वर पटेल, सुनील साळुंखे, ईश्‍वर सोनवणे, हर्षल पाटील, हेमंत पाटील, जयदीप ठाकरे, माधुरी शर्मा, राजेन्द्रसिंह राजपूत, महेश भदाणे, प्रमोद पाटील, किरण शिरसाठ, प्रकाश गावित, शरद चव्हाण, गणेश भावसार यांनी सहभाग घेतला.