अभियांत्रिकीमध्ये शाहू महाविद्यालय नेहमीच अग्रेसर : डॉ. विटकर

0

शाहू कॉलेजमध्ये राष्ट्रीय परिषद संपन्न

पिंपरी : इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन विभाग हा राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयातील नेहमीच अग्रेसर विभाग आहे. यासारख्या कार्यक्रमातून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवत असतात, असे मत डॉ. पी. पी. विटकर यांनी व्यक्त केले. अशाच प्रकारच्या विविध अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे संशोधन प्रदर्शित करण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सहयोगाने जे. एस. पी. एम संचलित राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ए. डी. शाळीग्राम होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मलेशिया राष्ट्रीय विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. मोहम्मद इस्माईल आणि कॅनडा मधील नामवंत विद्यापीठाचे प्रा डॉ. व्ही. सी. भावसार उपस्थित होते. या कार्यक्रमास विशेष मार्गदर्शन म्हणून ताथवडे संकुलाचे संचालक डॉ. पी. पी. विटकर, जे. एस. पी. एम. चे संचालक डॉ. रवी जोशी, ताथवडे संकुलाचे सहसचिव प्रा. सुधीर भिलारे आणि राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन उपस्थित होते. या कार्यक्रमास संपूर्ण जगभरातून 70 संशोधन क्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थी सहभागी झाले होते.

ऊर्जा बचतीची आवश्यकता
यावेळी डॉ. भावसार यांनी जगभरातील विविध विकसित तंत्रज्ञानावर भाष्य केले. बिग डेटा आणि आय. ओ. टी यासारख्या नवीन तंत्रज्ञानावर त्यांनी मार्गदर्शन केले. डॉ. मोहम्मद इस्माईल यांच्या मते टेलिकम्युनिकेशन क्षेत्रात ऊर्जा बचतीची नितांत आवश्यकता आहे. ऊर्जा बचतीमध्ये त्यांनी केलेल्या विविध संशोधनाची माहितीही दिली. प्राचार्य डॉ. आर. के. जैन यांनी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलीकम्युनिकेशन विभागाचे अभिनंदन केले. तसेच महाविद्यालयात चालू असलेल्या विविध संशोधनाबद्दल माहिती दिली. संपूर्ण जगभरातून निवडक 50 संशोधन क्षेत्रातील प्राध्यापक व विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध संशोधनाची माहितीही दिली.