पिंपरी-चिंचवड : रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे वडगाव मावळ मधील वडेश्वर येथे राष्ट्रीय सेवा योजना हिवाळी शिबिर झाले. याचे उद्घाटन पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे उपाध्यक्ष चंद्रकांत सातकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सरपंच गुलाब गभाले, उपसरपंच कुंडलिक लष्करी, राजेश खांडभोर, शंकर हेमाडे, विक्रम हेमाडे आदी उपस्थित होते. शिबिरात डॉ. जयंत उमाळे, संजय लकडे, डॉ. एन.बी. चोपडे, डॉ. अंजना अरीकेरीमठ, सर्पमित्र अतुल सवाखंडे, विवेक सांबारे आदींनी मार्गदर्शन केले. सात दिवसांच्या या शिबिरात बंधारा उभारणी, ग्राम स्वच्छता, संगणक दान व प्रशिक्षण, महिला सबलीकरण, शोषखड्डे, माजी विद्यार्थी मार्गदर्शन, मतदान जनजागृती, वृक्षारोपण, सलग समतर चर (सीसीटी), सापाबाबत समज – गैरसमज, बंधारा बांधणे, शालेय विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, समाज प्रबोधनपर बाहुली नाट्य व कार्यक्रम, वित्तीय साक्षरता अभियान, करीअर मार्गदर्शन, चिंतन, अंधश्रध्दा निर्मुलन, शेतकर्यांसाठी लागणार्या कृषी पद्धतीबद्दल माहिती संकलन करणे, संशोधन व व्यक्तीमत्व विकासासाठी उपक्रम आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
प्राचार्य डॉ. अजय फुलंबरकर, डॉ. शितल भंडारी, प्रशांत पाटील, प्रा.आर.टी जगताप, प्रा. निखिल सुरवाडे, प्रा. केतन देसले, प्रा. संतोष पाचारणे, विद्यार्थी प्रतिनिधी राज गांधी, किरण जाधव, कार्यालयीन कर्मचारी अस्मिता मोरे, नितीन कुरवार, सागर तामोरे, ईश्वर बो-हाडे, तुकाराम भसे आदींनी शिबिराचे आयोजन सहभाग घेतला होता.