अभियांत्रिकी महाविद्यालयात आज इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड

0

पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे शुक्रवारी ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमात एका दिवसात कमीतकमी वेळेत बहुतांश कॉपीराईटची नोंदणी करण्यात येणार आहे. यावेळी अभियांत्रिकीचे विद्यार्थी व शिक्षक आपले संशोधन प्रकल्प अहवाल कॉपीराईटसाठी ऑन लाईन पध्दतीने नोंदणी करणार आहेत.

अशा पध्दतीचे रेकॉर्ड आतापर्यंत झालेले नाही, अशी माहिती पीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरिष तिवारी यांनी माहिती दिली. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे उप कुलसचिव प्रमोद भडकवडे, सहाय्यक संचालक तंत्रशिक्षण विभाग पुणेचे आर.पी. गायकवाड, जीपीपीचे संगणक विभाग प्रमुख यु.वी.कोकाटे आदी उपस्थित राहणार आहेत. प्रा. हरिष तिवारी व डॉ. अर्चना चौगुले मार्गदर्शन करणार आहेत.