जामनेर । शहराच्या बाहेरील मुख्य मार्गावर आपले वाहन उभे करून पोलिसांसारख्या गणवेशात पुणे येथील एका संस्थेच्या कर्मचार्यांनी रस्ता सुरक्षेच्या आभियानाच्या गोंडस नावाखाली वाहन धारकांची आर्थिक लुट चालवली होती. काही सुज्ञ नागरिकांनी याची माहीती पत्रकारांना कळविली. त्यावरून तिथे जावून प्रत्यक्षपणे खात्री केल्यावर पुणे येथील एस.पी.पी.एल.नावाने असलेल्या संस्थेचे 4/5 कर्मचारी जळगाव जामनेर रस्त्याने येणार्या व जाणार्या मोटर सायकल स्वारांना धमकी स्टाईलमधे थांबवून रस्ता सुरक्षेच्या नावाखाली प्रत्येकाकडून 50 रुपयांची वसुलीकरीत असल्याचे दिसले. त्यांना या विषयी विचारणा करून सोबतच्या वाहनासह जामनेर पोलिस स्टेशनला आणले.
संबंधित कर्मचारी यांना संस्थेकडून वाहतुकीचे नियमा संदर्भात गावोगाव जावून रस्त्यावर 1 दिवस अभियान करून जास्तीत जास्त चालकांपर्यंत वाहतुकींच्या नियमांचा अभ्यास पोहचविणे व त्या संबधीच्या सुचना करून.माहीती ग्रामीण भागात पोहचवणे. त्यासाठी नियमावलींच्या पुस्तीकेचे 50 रुपये शुल्क घेवून.पुस्तक वीक्री करण्याचे स्पष्टपणे सांगितले असतांनाही या कर्मचार्यांनी स्वतः नियमांची ऐशी तैशी करून धमकी स्टाईल ने येणार्या जाणार्या वाहन धारकांकडून सक्तीची वसुली चालवली होती. दरम्यान या कर्मचार्यांना पोलीस स्टेशनला आणतांना त्यांच्याकडे वाहनातच आपले खाकी वर्दीतील कपडे बदलून दुसरे कपडे घातले.त्यामुळे यामागील नेमके सत्य काय याबाबत चर्चा सुरू होती. तथाकथित संस्थेच्या कर्मचार्यांना चौकशी नंतर ताकीद देवून सोडून देण्यात आले.