जळगाव । उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाशी संलग्नित असलेल्या अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये शिकणार्रा जुन्या व नव्या अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षाकरीता कॅरीऑन देण्यात यावा, यामागणीसाठी राष्ट्रीय विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी वुई वाँट कॅरीऑनच्या घोषणांनी विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरील परिसर दणाणून सोडला होता. कुठलाही निर्णय न झाल्यास उपोषणाचा इशारा दिला आहे.
कुठलाही निर्णर नाही
राज्यातील नांदेड व औरंगाबाद विद्यापीठाने अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी कॅरीऑनचा नियम लागू केला. परंतू या नियमाबाबत नांदेड विद्यापीठाला राज्यपाल यांच्याकडून विचारणा होवून नोटीस देण्यात आली आहे. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरुंनी चर्चा करण्यासाठी आलेल्या एनएसयुआयच्या शिष्टमंडळाला कॅरीऑनबाबत कुठलाही निर्णय होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले.
निवडणुकीनंतर निर्णय !
13 रोजी करण्यात आलेल्या आंदोलनावेळी प्रभारी कुलसचिव यांनी याबाबतच निर्णय प्रधिकरणाच्या हाती असल्याचे सांगून निवडणुका झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. निवडणुका होवून आठवडा उलटल्रानंतरही विद्यापीठ प्रशासनाने कॅरीऑन संदर्भात कुठलाही ठोस निर्णय न घेतल्याने पुन्हा एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष मराठे यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठावर धडक मोर्चा काढण्यात येवून आंदोलन करण्यात आले. यावेळी कुठलाही अनूचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांना पाचारण करण्यात आले होते.
राज्यपाल निर्णय घेतील
कॅरीऑनच्या निर्णयाबाबत कुलगुरुनीं स्पष्ट भुमिका मांडली. यावेळी कुलगुरुंशी चर्चा करण्यासाठी गेले एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र मराठे यांच्यासह पदाधिकार्रांनी कुलगुरुंच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. यावेळी धरणगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक सोनवणे यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने कॅरीऑन संदर्भात अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षेपूर्वी राज्यपाल निर्णय घेतील असे सांगितले.