जळगाव । घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126 जयंती जिल्हाभरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शाळा, प्रशासकिय, सामाजिक, राजकीय व खासगी संस्थेत जयंतीनिमित्त विविध उपक्रम राबविण्यात येऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवनकार्याला उजाळा देण्यात आला. तसेच गावागावात स्थापन झालेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
चाळीसगाव तालुक्यात एकत्रित स्वाभिमानी जयंती साजरीे : शहरासह तालुक्यात सालाबादप्रमाणे समाज बांधवांच्यावतीने एकत्रितपणे मोठ्या जल्लोषात एकत्रित स्वाभिमानी जयंतीचे आयोजन येथील तरुण बौद्ध मंडळ, भीम नगर मित्र मंडळ, मातोश्री रमाबाई आंबेडकर नगर स्टेशन विभाग यांचे संयुक्त विद्यमाने करण्यात आले. रेल्वे स्टेशन बाहेरील रिक्षा स्टॅन्ड जवळ डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे पूजन तालुक्याचे आमदार उन्मेष पाटील, माजी आमदार राजीव देशमुख, साहेबराव घोडे, ईश्वर जाधव, नगराध्यक्षा आशालता चव्हाण, वसंत चंद्रात्रे, किसनराव जोर्वेकर, विश्वास चव्हाण, डीवायएसपी अरविंद पाटील, पोलीस निरीक्षक आदिनाथ बुधवंत, रोशन जाधव, धर्मभूषण बागुल, रामचंद्र जाधव, आनंद खरात, किरण जाधव, लक्ष्मण शिरसाठ, गणेश पवार आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संजय घोडेस्वार, गौतम जाधव, संभा जाधव, नगरसेवक रवींद्र चौधरी, चंद्रकांत तायडे, बंटी ठाकूर, शाम देशमुख, दीपक पाटील, चिरागोद्दीन शेख, घृष्णेश्वर पाटील, सुरेश स्वार, शेखर बजाज, विजया पवार, संगीता गवळी, विजया पवार, झेलाबाई पाटील, वंदना चौधरी, योगिनी ब्राह्मणकर, वत्सला महाले, सायली जाधव, सविता राजपूत व गफूर पहेलवान, यू.डी. माळी, प्रभाकर चौधरी, महेंद्र राजपूत, सोमसिंग राजपूत, मुकेश नेतकर यांचेसह समाजातील प्रतिष्ठित नागरिक, मान्यवर, भीम सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी अधिक परिश्रम धर्मभूषण बागुल, कालिदास अहिरे, रोशन जाधव, रामचंद्र जाधव, आनंद खरात, गौतम जाधव, वकील राहुल जाधव, किरण जाधव, संभा जाधव, बबलू जाधव, किरण मोरे, शाम जाधव, शरद जाधव, मनोज जाधव, घमा जाधव, दिनेश मोरे, गौतम झाल्टे, सागर जाधव, दादा निकम, निलेश निकम, प्रशांत जाधव, दीपक जाधव आदींनी घेतले. चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याच्या वतीने पोनि आदिनाथ बुधवंत व अधिकारी कर्मचार्यांनी चोक बंदोबस्त ठेवला होता.
शिरपूर येथे भव्य शोभा यात्रेसह जल्लोष : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती शिरपूर येथे उत्साहात झाली. त्याआधी मार्केट कमिटीमधील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयास माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांच्यासह अनेक मान्यवरांनी अभिवादन करुनविविध कार्यक्रम संपन्न झाले. शोभायात्रेचे उद्घाटन नगरसेवक तपनभाई पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. दरवर्षाप्रमाणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित् मार्केट कमिटी येथील परिसरात भव्य् दिव्य् कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सुरुवातीस माजी शिक्षणमंत्री आमदार अमरिशभाई पटेल यांनी बाबासाहेब यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करुन अभवादन केले. यावेळी व्यासपीठावर आ.अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा, टेक्सटाईल पार्क चेअरमन तथा नगरसेवक तपनभाई पटेल, जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रभाकरराव चव्हाण, बाजार समिती सभापती नरेंद्रसिंग सिसोदिया, शिरपूर एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष राजगोपाल भंडारी, शिरपूरमर्चंट बँकेचे अध्यक्ष प्रसन् जैन, माजी नगराध्यक्षा सौ. संगिता देवरे, नगरसेविका अरुणा थोरात यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समितीच्या सल्लागार मंडळ नगरसेवक पिंटू शिरसाठ, नगरसेवक गणेश सावळे, विनायक वाघ,बाबुराव खैरनार, रमेश वानखेडे, विजय बागले, सुनिल शिरसाठ, शौकिन कुवर, रमेश कढरे, गोविंदा खैरनार, किरण कढरे, मनोहर निकम, प्राचार्य सिद्धार्थ पवार, ड. युवराज ठोंबरे, गिरीष थोरात, राजू जाधव, सुनिल वानखेडे, सतिष मोरे, भूषण थोरात, श्रीराम थोरात, जगदिश थोरात, विक्की वाघ, मनोज मोरे, दिपक नगराळे, विशाल थोरात, सागर डांगे, अतुल ब्राहमणे, मनोल शिरसाठ, सुनिल वानखेडे, सनी वानखेडेयांच्यासह अनेक पदाधिकारी यांनी परीश्रम घेतले.
चाळीसगाव तालुक्यातील जामठी येथील नवतरुण बौध्द मंडळातर्फे डॉ. बाबासाहेबांना मानवंदना : तालुक्यातील जामडी येथे नवतरुण बौध्द मंडळच्या वतीने 14 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन रयत सेनेचे संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांच्यासह रयत शेतकरी सेनेचे जिल्हाअध्यक्ष दिपक राजपुत, सरपंच युसुफ शेख, पोपा रायसिंग परदेशी, माजी सरपंच अरुण जाधव, ग्रामसेवक मुळे यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते भैय्या जाधव, ग्रा.पं. सदस्य शांताराम मोरे, देवसिंग परदेशी, शाखाध्यक्ष संजय परदेशी, उपाध्यक्ष राजु परदेशी, समन्वयक भगवान परदेशी, शाम परदेशी, प्रदीप राजपुत, मोयद्दीन टेलर, सीताराम अहिरे, धनराज अहिरे, भागवत अहिरे, नारायण अहिरे, अनिल जाधव, मधुकर अहिरे, काशीनाथ अहिरे, संदीप खैरे, दिपक खैरे, सचिन अहिरे, भुषण जाधव, योगेश अहिरे, समाधान मोरे, भास्कर अहिरे, सागर अहिरे, गौतम अहिरे, बाळु जाधव, सुभाष जाधव, सुपुडु गोलाईत, रवि अहिरे, सतीश अहिरे, कैलास अहिरे, पिंटु लोखंडे, भिवा मोरे, अशोक अहिरे, भुरा जाधव, गंभीर जाधव, बापु अहिरे, जितु अहिरे, आकाश जाधव, आकाश मोरे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जामनेरात भारतीय बौध्द महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने अभिवादनः भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 126 वी जयंती शुक्रवारी 14 रोजी जिल्ह्याभरात साजरी करण्यात आली. जामनेर शहरात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भिमनगर येथे भारतीय बोध्द महासभा व समता सैनिक दल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातुन प्रतिमा मिरवणुक काढण्यात आली. नगराध्यक्ष साधना महाजन यांच्या हस्ते बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी महेंद्र बाविस्कर, पोलीस निरीक्षक नजीर शेख, शंकर राजुपत, अजय पाटील, अशोक नेरकर आदी उपस्थित होते. यशस्वीतेसाठी नगरसेवक मुकुंद सुरवाडे, गोपाल भिमडे, सुभाष सुरवाडे, महेंद्र मोरे, संतोष सुरवाडे, चंद्रमणी पाटील, महेंद्र रणीत, सौरभ अवचारे, अक्षय निराले, राजरत्न इंगळे, कुंदन सुरवाडे, आदर्श इंगळे आदींनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातून नागरीकांनी उशिरा रात्री मिरणूक काढून घेतली.
जनकल्याण युवा फाऊंडेशनचा उपक्रम
महात्मा ज्योतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमत्ताने जनकल्याण युवा फाऊंडेशनच्यावतीने उपक्रम राबविण्यात आला. महाबळ परिसरातील पीपल्स बँकेजवळ फाऊंडेशनच्यावतीने स्टॉल उभारण्यात येवून समता नगर व संभाजी नगरातील मिरणूकीचे स्वागत करण्यात आले. यावेळी मिरवणूकीत सहभागी नागरिकांना पाणी पाऊचचे वाटप करण्यात आले. यावेळी नगरसेवक नितीन बरडे, इंजिनिअर डी.एन.तिवारी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनकल्याण फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर जाधव, उपाध्यक्ष दिनेश सपकाळे, राहुल इंगळे मयुर निवतकर, राकेश खर्चाणे, खुशाल सोनवणे, आकाश नरवाडे, विकास गवळी, मुकेश जाधव, सागर देहाडे, अर्जुन पाटील, बाळा सोनार, नागराज ठाकरे, राजू कोळी, युवराज तायडे, प्रदीप सपकाळे, भिकन ठाकरे आदींचे सहकार्य लाभले.
म्हसदी ता.साक्री येथे अभिवादन
साक्री तालुक्यातील ककाणी येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात डॉ.बाबाासाहेब आंबेडकरांची 126वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक एस.एन.ह्याळींजे अध्यक्षस्थानी होते. प्रारंभी डॉ.बाबासाहेब अांबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर के.व्ही. देवरे यांनी प्रास्ताविक केले. तर मुख्याध्यापक ह्याळींजे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन चरित्र्याची माहिती दिली. यावेळी व्ही.वाय. कुंवर, एम.एस.देवरे, पी.डी.शेवाळे, के.व्ही.देवरे, बी.आर. सोनवणे, किशोर भामरे, दीपक पवार, दयाराम पवार, रविंद्र पेंडसे, बापू गायकवाडद्व जी.एम. मण्यार उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भटू वाणी यांनी केले.
भावेर ता. शिरपूर येथे महामानवाला अभिवादन : समाज प्रबोधनाच्या चळवळीतील एक अभ्यासू व्यक्तीमत्व म्हणजे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे होते असे प्रतिपादन भावेर येथे जयंती कार्यक्रमाप्रसंगी जि.प.सदस्य प्रा.संजय पाटील यांनी केले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब यांचे विचार हे समतेचा विचार असुन ते समाज प्रबोधनाच्या चळवळीचे अभ्यासू व्यक्तीमत्व ठरले आहे. आजच्या तरुण पिढीने बाबासाहेबांचे विचार आत्मसात करुन आचरणात आणणे गरजेचे असल्याचे मतही पाटील यांनी नोंदविले. यावेळी अॅड.सुनील भोई, सरपंच सुदाम गुजर, माजी सरपंच हिंमत धनगर, उपसरपंच महेमुद पटेल, भटेसिंग राजपूत, प्रकाश गुजर, प्रविण धनगर, नवल धनगर यांची प्रमुख उपस्थिती होतीे. प्रमुख पाहुण्यांनी बाबासाहेबांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पंडीत करणकाळ, दशरथ करणकाळ, सचिन पवार, भिका करणकाळ, निलेश करणकाळ आदींचे सहकार्य लाभले.
बोरदे ता. शिरपूर येथे आंबेडकर जयंती उत्साहात: शिरपूर तालुक्यातील बोरपाणी येथे पुतळा स्थापनाचे भूमिपूजन भाजपा अध्यक्ष राहुल रंधे यांच्याहस्ते करण्यात आले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच जाड्या पावरा, ताराचंद पावरा, कृउबा संचालक सुखदेव भिल, माजी जिप सदस्य नका पावरा, भावश्या पावरा, खंडू आण्णा शिरसाठ,निलेश महाजन, धीरज राजपूत, शेखर माळी व सन्मानीय ग्रामस्थ उपस्थित होते. कोडीद येथे परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व गावांतर्गत रु 10.लक्ष निधी खर्चाचे कॉक्रीट रस्त्याचे लोकार्पण तालुकाध्यक्ष राहुल रंधे व सरपंच सौ ताराबाई दिलीप पावरा यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृउबा संचालक सुखदेव भिल, उपसरपंच दिपालीबाई ईशी, भारत पावरा, गौतम सोनवणे, विलास पाटील, संतोष पावरा, रेवाज्या पावरा, शिवा भिल, राजेंद्र पाटील, मंज्या पावरा, कांतीलाल पावरा, कालूसिंग पावरा, नुरोद्दीन बोहरी, मुर्तुजा बोहरी, धीरज राजपूत आदी उपस्थित होते.
डोंगर कठोरा ता.यावल येथे बाबासाहेबांना अभिवादन: यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. ग्रामपंचायत मध्ये बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सदस्यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी सरपंच सुमनबाई वाघ, उपसरपंच नितीन भिरुड, यदुनाथ पाटील, ग्रामविकास अधिकारी अर्जुन पाचवणे, सदस्य रत्नदीप सोनवणे, प्रीतम राणे, शशिकला भिरुड, रेखा तडवी, हसीना तडवी, पोलीस पाटील सिद्धार्थ तायडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हा परिषदेच्या नवनिर्वाचित सदस्या सविता भालेराव यांनी भेट देऊन विचार मांडले. सायंकाळी गावातून मिरवणूक काढण्यात आली. बाबासाहेबांचे विचार तळागाळात पोहोचविण्यासाठी आम्ही सतत प्रयत्न करू, असा विश्वास तरुणांनी व्यक्त केला. जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर 13 एप्रिल रोजी आंबेडकर नगरमध्ये अन्नदानाचा कार्यक्रम पार पडला. बौद्ध पंच मंडळासह सर्व समाज बांधवानी सहकार्य केले.