अभ्यासकांसाठी महाराष्ट्र वार्षिकी २०१७ उपलब्ध

0

माहिती, जनसंपर्क महासंचालनालयाची निर्मिती

जळगाव । माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह यांच्या संकल्पनेतून तयार झालेली ‘महाराष्ट्र वार्षिकी २०१७’ ही संदर्भीका नागरिकांसाठी उपलब्ध झाली आहे. महाराष्ट्राची अधिकृत, वस्तुनिष्ट माहिती देणार्‍या पुस्तकाची गरज अनेक वर्षापासून व्यक्त केली जात होती. महाराष्ट्र वार्षिकी २०१७ च्या रुपाने ही गरज पूर्ण झाली आहे. या पुस्तकामध्ये महाराष्ट्राचा इतिहास, भूगोल, जनजीवन, महाराष्ट्राची परंपरा, महाराष्ट्रातील जिल्हे, शासनाचे विभाग, गत वर्षातील राज्य शासनाच्या संदर्भात महत्वाच्या घडामोडी, भारताचे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान, मंत्रीमंडळ निर्णय, केंद्राचे व महाराष्ट्राचे मंत्रीमंडळ, महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य, संसद सदस्य आदींची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे.

सर्व क्षेत्रातील उपयुक्त
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रसिध्द केलेले महाराष्ट्र वार्षिकी २०१७ हे पुस्तक स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी, अभ्यासक, प्राध्यापक, पत्रकार, राजकीय नेते, सामान्यज्ञानाची आवड असणारे सर्व वयोगटातील नागरिक यांना उपयुक्त आहे. महाराष्ट्र वार्षिकी २०१७ या पुस्तकाची किंमत फक्त ३०० (तीनशे) रुपये आहे. हे पुस्तक विक्रीसाठी जिल्हा माहिती कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, टप्पा क्र. ३, पहिला मजला, आकाशवाणी केंद्राजवळ, जळगाव. दूरध्वनी क्रमांक ०२५७/२२२९६२८ येथे तसेच उप माहिती कार्यालय, ‘छाया’ निवास, स्टेट बँक इमारत, भडगाव रोड, चाळीसगाव दूरध्वनी क्र. ०२५८९/२२२५०८ येथे उपलब्ध आहे.