अभ्यासक्रमाच्या पलिकडे जाऊन जीवनाचा विचार करावा

0

फैजपूर । विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमाच्या पलिकडे जावून जीवनाचा विचार केला पाहिजे. देश महान करायच असेल तर जनता महान बनली पाहिजे या देशातील तरुण विद्यार्थ्यांच चरित्र मजबूत घडविण्याच काम ही संस्था करते, असे प्रतिपादन माजी आमदार तथा तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी धनाजी नाना महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभाप्रसंगी केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभासाठी नाहाटा महाविद्यालय भुसावळच्या प्राचार्या डॉ. मिनाक्षी वायकोळे या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. यावेळी व्यासपीठावर तापी परिसर विद्या मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. एस.के. चौधरी, व्हा. चेअरमन प्रा. के.आर. चौधरी, सचिव प्रा. एम.टी. फिरके, सहसचिव प्रा. एस.एम. फिरके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी.आर. चौधरी, उपप्राचार्य डॉ. ए.आय. भंगाळे, डॉ. उदय जगताप, प्रा. ए.जी. सरोदे, प्रा. डी.बी. तायडे, स्नेेहसंमेलन प्रा. आर.आर. राजपूत उपस्थित होेते.

पुस्तकाचेे प्रकाशन
महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरणात डॉ. ए.आय. भंगाळे, डॉ. जी.जी. कोल्हे, डॉ. डी.एल. सुर्यवंशी, डॉ. मारोती जाधव या प्राध्यापकांनी पीएच.डी. प्राप्त केल्याबद्दल प्रा. बी.ए. संदानशिव, प्रा. डी.आर. तायडे यांची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या मागासवर्गीय प्राध्यापक संघटनेच्या अध्यक्ष व सचिव पदावर नियुक्तीबद्दल प्राध्यापिका वैशाली कोैळी यांनी सेट परिक्षा उत्तीर्ण तर डॉ. सिंधू भंगाळे यांना आदर्श माता पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रा. शिवाजी मगर यांचे पुस्तक प्रकाशित झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

यांचा झाला सत्कार
लतेश भंगाळे याने नेट परिक्षा उत्तीर्ण केली. प्रियंका पाटील हिने विद्यापीठ परिक्षेत एम.ए. इंग्रजी विषयात प्रथम क्रमांक आल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सुत्रसंचालन डॉ. सागर धनगर यांनी केले तर आभार विद्यापीठ प्रतिनिधी विशाखा महाजन हिने मानले.