रावेर। येथे महू येथुन संविधान रथ संपुर्ण भारत देशात सविधान जनजागृती देशाप्रती आपले अधिकार हक्क व कर्तव्य आणि कायदे जाणुन घेण्यासाठी तसेच एक भारत श्रेष्ठ भारत निर्मितीसाठी संविधान जनजागृती आवश्यक आहे. यासाठी इयत्ता 5 वी ते 12 पर्यतचा अभ्यासक्रमात संविधान विषयाचा समावेश करावा अशी मागणी भारतीय संविधान रथ यात्रेचे प्रणेते तथा व्हिजन ऑफ बाबासाहेब वेल्फेअर असोशियनच्या सुशिला भारतीय यांनी रावेर येथे झालेल्या बैठकीत केले.
यांची होती उपस्थिती
सर्वप्रथम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पृर्णाकृती पुतळयास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अपर्ण करून दिप व धुप पुजन करुन त्रिशरण पंचशील घेवून सर्वानी अभिवादन केले. समाजाच्या वतीने आलेले पाहुण्यांच्या पुष्पहार देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कामगार नेते दिलीप जी. कांबळे, नगरसेवक जगदीश घेटे, माजी नगरसेवक अॅड. योगेश गजरे, भारीप बहुजन संघाचे तालुकाअध्यक्ष बाळु शिरतुरे, उपसंपादक दिपक नगरे, पत्रकार राजेंद्र अटकाळे, शकील दादा, नुरा भाऊ तडवी, पंकज वाघ, के.सी. गाढे, महेश तायडे, सदाशिव निकम, सिताराम तायडे, प्रदिप तायडे, नितीन मोरे, दिलीप पानपाटील, ससाणे, विनोद सोनवणे, गोविंदा अटकाळे, सुरेश अटकाळे यांचेसह असंख्य महिला पुरुष उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भारतीय बौद्ध महासभेचे तालुका सचिव सदाशिव निकम यांनी तर आभार भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष विजय अवसरमल यांनी मानले.