अभ्यासात, निकालात मुली का पुढे आहेत?

0

बोर्ड एसएससी असो वा आयसीएसई वा सीबीएसई त्यांचे दहावी बारावीचे निकाल जाहीर झाले की, त्यात ‘टॉपर’ म्हणून असतात त्या मुली. अभ्यासात, निकालात मुली का पुढे आहेत वा जाताय याचा अभ्यास करता काय दिसते? मी थोडं मागे जातो. 1992 चा 12 वी चा निकाल जेव्हा लागला तेव्हा महाराष्ट्रात मिनाक्षी नलबले ही विज्ञान शाखेत पहिली आली रात्री तर वाणिज्य व कला शाखेतही मुलीच पहिल्या आल्या होत्या व त्यांचे मुलांपेक्षा एकूण उत्तीर्ण होण्याचे प्रमाण जवळपास 15 टक्क्यांनी जास्त होते. असो, पाठ्यपुस्तकांचा, तोही खोलवर व नियोजनानुसार अभ्यास, स्वतःच्या नोट्स तयार करण्याच्या विविध (पण सोप्या) पद्धती, क्लासेसला जास्त वेळ न घालवता सेल्फस्टडीज जास्त वेळ, गृपस्टडीज विषय समजवून घेण्याची योग्य पद्धत, वर्षाच्या सुरूवातीपासून विविध संदर्भ ग्रंथ वापरण्याची चांगली सवय, अवांतर वाचनाची दिलेली जोड, धोकमपट्टीला वाव न देता अभ्यासाची वेगळी पद्धत, घरात घरच्यांसमवेत रमत/घरची छोटीमोठी काम करत अभ्यासाकडे दुर्लक्ष न करणे, विविध अनुभवांचा अभ्यासाशी संबंध जोडत त्यानुसार तयारी करणे, विज्ञानातील शिक्षण व्यवहारातून शास्त्राकडे या नैसर्गिक क्रमाने घेण्याची वृत्ती, स्वतःसह घराला सांभाळून अभ्यास करण्याची वृत्ती, वेळेचं भान राखत नियोजनानुसार काम हातावेगळी करण्याची छानशी सवय व हाती घेतलेल्या प्रत्येक विषयाला अभ्यास आनंदाने व दिल से करण्याची सहजप्रवृत्ती या सार्‍या कारणांमुळे जी कारण मी गेल्या 10 वर्षापासून गोळा करतोय. मुली विविध क्षेत्रात बाजी मारताय व त्यांनी बाजी मारली.

काही जणांना हे पटणार नाही. पण ही वस्तुस्थिती आहे व राज्यात 12 वीत पहिले येण्याचा मान मिळविणार्‍या मिनाक्षी नलबले हिच ह्यांच क्रेडीट दिले पाहिजेच. तिला जेव्हा मी यासंबंधी विचारलं होतं तेव्हा ती म्हणाली होती. कोचिंग क्लासला मी कमी गेले. धोकमपट्टीला मी कधीही स्थान दिले नाही, अभ्यासातील विषयांचा दैनंदिन व्यवहारांशी कसा निकटचा संबंध आहे. हे मी सातवी-आठवीपासून जाणले व तिचं दृष्टी ठेवत नियोजनबद्ध रितीने अभ्यास केला. पुस्तके शब्द शिकवतात. त्यांचा अर्थ समजून घेण्यासाठी (दैनंदिन) जीवनाकडे वळणे अपरिहार्य असते, हे मी मित्र मैत्रिणींसह जाणले. एकमेकांना सहकार्य करत आम्ही पुढे गेलो. असो. शिक्षण पद्धतीतील मार्काचे स्थान तर म्हणावे की परिक्षा पद्धतीतील शिक्षणाचे स्थान, यात न शिरता मी एवढंच म्हणजे की आज परीक्षांच्या निकालात मुलींचे जे यश दिवसागणिक वाढतेय त्यामागे त्यांची प्रचंड मेहनत आहे. एवढं मात्र निश्‍चित !

चंद्रकांत भंडारी, जळगाव