अभ्यासाबरोबर खेळ व संस्कारही महत्वाचे : अभिनेता सुनील थापा

0

खानिवडे : अभ्यासाबरोबर खेळ व संस्कारही महत्वाचे आहे व ते कार्य गिरिजाराम वेल्फेअर फाउंडेशन गरीब विध्यार्थ्यांसाठी विशेषतः आदिवासी विध्यार्थ्यांसाठी करतेय हे पाहून खूप समाधान वाटले . असे प्रतिपादन मेरी कोम या गाजलेल्या चित्रपटात बॉक्सिंग प्रशिक्षकाची लक्षवेधी भूमिका साकारणारे अभिनेते सुनील थापा यांनी कामण आश्रम शाळा येथे कराटे प्रात्यक्षिके व वार्षिक अहवाल या फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात केले .

यावेळी फाउंडेशनचे संस्थापकीय अध्यक्ष केदारनाथ म्हात्रे ,उपसरपंच मनोज म्हात्रे , अस्लम शेख ,लोक बहादूर सिंग,संजय म्हात्रे , पाध्ये म्याडम,लक्ष्मण विरारकर आदी मान्यवर उपस्थित होते .यावेळी विद्यार्थ्यांनी कराटेचि आकर्षक प्रात्यक्षिके दाखवली .

फाउंडेशन तर्फे कामण , मोरी,ससुनवघर,पेल्हार या भागातील आदिवासी विध्यार्थ्यांसाठी मोफत कराटेचे प्रशिक्षण देत असून नृत्य ,नाट्य,संगीत,व्यक्तिमत्व विकास ,आरोग्य शिबिरे ,खेळाडूंना मार्गदर्शन व नागरिकांचे प्रबोधनात्मक कार्यक्रम वर्षभर राबवत असते. २६ मार्च रोजी झालेल्या या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवेंद्र भोस्कर यांनी तर घोडके सरांनी आभार प्रदर्शन केले.