अभ्यासाव्यात्तीरिक्त विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्य अवगत करावी महाविद्यालयात “करियर कट्टा” मार्गदर्शन कार्यक्रमात: प्रा.संध्या सोनवणे
यावल(प्रतिनिधी)जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्र.प्राचार्या डॉ. संध्या सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली विद्यार्थी विकास विभागामार्फत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी ‘करियर कट्टा’ मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला.कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राअर्जुन पाटील यांनी विद्यार्थ्यांना करियर संदर्भात मार्गदर्शन करताना आजच्या वर्तमान युगात कोणतीही शासकीय नोकरी मिळवण्यासाठी स्पर्धा परीक्षा हाच एकमेव पर्याय आहे.विद्यार्थ्यांनी पदवी पर्यंतचे शिक्षण घेत असतानाच स्पर्धा परीक्षेची तयारी करणे महत्त्वाचे आहे असे आवाहन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, सध्याच्या धावपळीच्या युगात स्पर्धा परीक्षा हा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने एकमेव मूलमंत्र आहे परंतु स्पर्धेत घवघवीत यश मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत विद्यार्थ्यांमध्ये परिवर्तन घडवून सुप्त गुण निर्माण झाले पाहिजेत. पैशाचे व्यवहारिक ज्ञान,वेळेचे महत्व,अभ्यासाचे नियोजन,जाहिराती विषयी जागरूकता, हे गुण विद्यार्थ्यांनी जोपासले पाहिजेत. रेल्वे,जिल्हा परिषद,कृषी,वनभरती,महसूल व अन्य विभागात नोकरी मिळवण्या साठी स्पर्धा परीक्षा ही महत्त्वाची बाब आहे,शिवाय विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण घेणे महत्त्वाचे आहे. इलेक्ट्रिशियन,प्लंबिंग कोर्स विद्यार्थ्यांच्या उदरनिर्वाहासाठी महत्त्वाचाआहे.विद्यार्थ्यांनी अभ्यासक्रमा व्यतिरिक्त वेगवेगळी कौशल्यअवगत करणे महत्त्वाचे आहे. ब्युटीपार्लर,मेहंदी, रांगोळी,मेकअप, फोटोग्राफी, चित्रकला हे व्यावसायिक कौशल्यातून विद्यार्थी स्वतःचा रोजगार उपलब्ध करू शकतात.त्यातून समाजातील साहित्य संस्कृती जोपासली जाते असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. नंदकुमार बोदडे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सुधीर कापडे यांनी केले. तर आभार प्रा. नरेंद्र पाटील यांनी मानले.
यावेळी कार्यक्रमाला डॉ. हेमंत भंगाळे, डॉ. पी. व्ही. पावरा, प्रा. एस. आर. गायकवाड उपस्थित होते.कार्यक्रमाला विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा. सुभाष कामडी, प्रा. छात्रसिंग वसावे, डॉ .संतोष जाधव, प्रा. अर्जुन गाढे, प्रा. अक्षय सपकाळे, प्रा. प्रशांत मोरे, डॉ. वैशाली कोष्टी, प्रा. प्रतिभा रावते, प्रा. रजनी इंगळे, श्री. मिलिंद बोरघडे, श्री. संतोष ठाकूर यांनी सहकार्य केले.