अभ्यासिका व ग्रंथालयाची मोफत सुविधा

0

बारामती | बारामती व आसपासच्या तालुक्यातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे चांगलाच ओढा आहे. त्यासाठी संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संकल्पनेतून व मार्गदर्शनातून साकारलेली सुसज्ज अभ्यासिका व ग्रंथालय विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. त्याचप्रमाणे या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याच महाविद्यालयातील शिक्षण पूर्ण केलेले व सध्या विविध ठिकाणी अधिकारी पदावर कार्यरत असलेले विद्यार्थी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आहेत. ही उल्लेखनीय बाब आहे, डॉ. भरत शिंदे यांनी यावेळी सांगितले. प्रा. डॉ. राजाराम चौधर यांनी प्रास्ताविक, प्रा. संजय खिलारे यांनी सूत्रसंचलन केले. प्रा. डॉ. लालासाहेब काशिद, प्रा. डॉ. सुवर्णा रासकर, प्रा. डॉ. बापू अवचर, प्रा. राजेंद्र वळवी आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित होते.